काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडे तब्बल सरकारी योजनेतील अकरा सदनिका

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री चंद्रकांत शिवरकर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप होतोय. पुण्यातील एका आर्थिक मागास योजना प्रकल्पात त्यांच्या नावे एक नाही, दोन नाही तर तब्बल अकरा सदनिका असल्याचे समोर आलंय. या सदनिकांचा उल्लेख त्यांच्या पत्नी नगरसेविका कविता शिवरकर यांच्या निवडणूक शपथपत्रात देखील आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 2, 2014, 09:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री चंद्रकांत शिवरकर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप होतोय. पुण्यातील एका आर्थिक मागास योजना प्रकल्पात त्यांच्या नावे एक नाही, दोन नाही तर तब्बल अकरा सदनिका असल्याचे समोर आलंय. या सदनिकांचा उल्लेख त्यांच्या पत्नी नगरसेविका कविता शिवरकर यांच्या निवडणूक शपथपत्रात देखील आहे.
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री चंद्रकांत शिवरकर यांच्या पत्नी कविता शिवरकर यांनी महानगरपालिकेच्या २०१२ मधील निवडणुकीत विजय मिळवला. मात्र ही निवडणुक त्यांच्यासाठी जेवढी आनंददायी ठरली तेवढीच आता अडचणीची ठरताना दिसतेय. निवडणुकीचा अर्ज भरताना त्यांनी शपथपत्रात त्यांचे पती चंद्रकांत शिवरकर यांच्या नावे अकरा सदनिका असल्याच्या उल्लेख केला आला.
या सदनिका हडपसर येथील आर्थिक मागास योजना गृह प्रकल्पातील आहेत. मात्र २००८ साली हा प्रकल्प पुनर्वसन नागरिकांसाठी उभारण्यात आला होता. शिवरकरांनी महापालिका आणि नाईकनवरे डेव्हलपर्स यांच्या मदतीने सदनिका लाटल्या, असा आरोप होतोय.
सदनिकांचे मुद्रांक शुल्क भरलेले नसताना, या सदनिका माझ्या नावे कश्या आल्या? अशी गुगली टाकत शिवरकर यांनी महापालिकेने चौकशी करावी अशी भूमिका घेतलीय.. सध्या या सदनिकांमध्ये नागरिक राहतायेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सदनिकांची थकबाकी ऑनलाईन दिसल्याने पत्नीचा अर्ज बाद होऊ नये म्हणून महापालिकेचा कर भरला. त्यामुळे या सदनिकांचा उल्लेख शपथपत्रात बळजबरीने करावा लागला, असं शिवरकर याचं म्हणणं आहे.
शिवरकरांच हे म्हणणे एकवेळ खरही धरुयात. जर हीच माहिती पत्नी कविता यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात दिली असेल, तर खोटी माहिती सादर केल्याबद्दल महापलिका त्याचं सभासद पद करणार का ? आणि जर माहिती खरी असेल तर शिवरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का ? हे बघणे आता उचित ठरेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.