तीन महिन्यांत निर्दोषत्व सिद्ध करणार - कलमाडी

खासदार सुरेश कलमाडी यांनी स्वतःलाच क्लीन चीट दिलीय. कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात गैरव्यवहाराचा आरोप कलमाडी यांच्यावर आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 14, 2013, 10:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
खासदार सुरेश कलमाडी यांनी स्वतःलाच क्लीन चीट दिलीय. कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात गैरव्यवहाराचा आरोप कलमाडी यांच्यावर आहे.
याप्रकरणी त्यांनी जेलची हवा देखील खाल्ली आहे. मात्र, ‘या गैरव्यवहाराच्या आरोपात काहीही तथ्य नाही. हे तुम्हाला लवकरच समजेल. त्यासाठी तीन महिने थांबा’ अशा शब्दात कलमाडी यांनी स्वतःला क्लीन चीट दिली आहे.
पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात कलमाडी यांनी आपण निर्दोष असल्याचं वक्तव्य केलंय. पुणे फेस्टिवलचे उद्घाटन केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल करणार होते. त्यामुळे निलंबित कलमाडींना काँग्रेस पुन्हा पक्षात घेण्याचा विचार करत आहे का? यावर तर्क-वितर्क लढवले जात होते. कपिल सिब्बल यांनी मात्र उद्घाटन या समारंभाकडे पाठ फिरवली.

पुणे फेस्टिव्हलला सुरुवात
दरम्यान, शुक्रवारपासून पुणे फेस्टिव्हलला दिमाखात सुरुवात झालीये. पुणे फेस्टिव्हलचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या फेस्टिव्हलचं उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. या फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी आणि तिच्या दोन मुली ईशा आणि आहानानं गणेश वंदना सादर करत उपस्थितांची मन जिंकली. त्याचप्रमाणे उर्मिला मातोंडकरच्या ठसकेबाज लावणीनं उपस्थितीतांची चांगलीच दाद मिळवली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.