टोल वसुलीवरून कोल्हापुरात संतापाची लाट

सर्वोच्च न्यायालयानं कोल्हापूरातील टोल वसुलीवरील स्थगिती उठवल्यानंतर कोल्हापूरात संतापाची लाट पसरली आहे.

Updated: May 7, 2014, 01:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयानं कोल्हापूरातील टोल वसुलीवरील स्थगिती उठवल्यानंतर कोल्हापूरात संतापाची लाट पसरली आहे.
टोल विरोधी कृती समितीनं या संदर्भात टोल विरोधी कृती समितीचे जेष्ठ नेते डॉ.एन.डी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत बैठक घेतली. यामध्ये पुन्हा एकदा टोल विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
येत्या भहिन्याभरात कोल्हापूरात ना भुतो ना भविष्यतो असा महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन सरकारला जाग आणावी अशी मागणी करण्यात आली.
महायुतीकडून वेगळं आंदोलन करण्याचा निर्णय
दरम्यान टोल आंदोलनाबाबत महायुतीनं वेगळं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर काहीही केल तरी आय.आर.बी कंपनीला टोल देणार नाही अशी भूमिका घेतलीय.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांना टोल रद्द करण्याबाबात अश्वासन दिलं होतं. ते त्यांनी पाळावं अन्यथा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.