रोडरोमिओंच्या मुकाबल्यासाठी रणरागिणी सज्ज

पिंपरीतल्या रणरागिणी आता रोडरोमिओंचा मुकाबला करण्यास सज्ज झाल्या आहेत. पोलिसांनी पुढाकार घेवून पिंपरी-चिंचवड मधल्या तरुणींना कराटे प्रशिक्षण देणं सुरु केलंय. या उपक्रमाचं सर्वसामान्यांमधून स्वागत होतंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 6, 2013, 05:54 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरीतल्या रणरागिणी आता रोडरोमिओंचा मुकाबला करण्यास सज्ज झाल्या आहेत. पोलिसांनी पुढाकार घेवून पिंपरी-चिंचवड मधल्या तरुणींना कराटे प्रशिक्षण देणं सुरु केलंय. या उपक्रमाचं सर्वसामान्यांमधून स्वागत होतंय.
वाढत्या गुन्हेगारीमुळं कायम टीकेचं लक्ष होत असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी एक कौतुकास्पद पाउल उचललंय. तरुणी, महिलांना मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिलांच्या स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी हे महत्वाचं पाऊल उचललंय.
दिल्ली गॅंगरेप प्रकरणानंतर तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यामुळं काही चांगले बदल होताना दिसत आहेत. त्याबद्दल समाधान बाळगायला हरकत नाही. पण या उपायांबरोबरच जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शिक्षा देत पोलिसांनी चांगला संदेश देण्याची गरज आहे. ब-याच वेळी पोलीस निष्काळजीपणा करतात आणि त्याचा फटका पिडीत तरुणींना आणि त्यांच्या कुटुंबियांना बसल्याचं समोर आलंय. म्हणून महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आणखी गांभीर्यानं विचार होण्याची गरज व्यक्त होत आहे.