नगरमध्ये राष्ट्रवादी-मनसेचं साटंलोटं; दिल्लीच्या निकालातून धडा नाहीच

नगरमध्ये सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं साटंलोटं जमून आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 30, 2013, 01:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
नगरमध्ये सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं साटंलोटं जमून आलंय.
राष्ट्रवादीला मनसेनं पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांची महापौरपदी वर्णी लागलीय. जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल शिंदे यांचा पराभव महापौरपदाच्या लढाईत पराभव केलाय. पण, यामुळे महाराष्ट्रानं दिल्लीच्या निकालातून काहीच धडा घेतला नसल्याचं दिसून येतंय.
अहमदनगर महापालिका निवडणुकीत कोणत्याच आघाडीला बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. अंतर्गत मतभेदाचा फटका युतीला बसल्याचं दिसून आलं होतं. राष्ट्रवादीनं १८, काँग्रेसनं ११, शिवसेनंनं १७, भाजपनं ९, मनसेनं ५ तर ८ जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.