अरे देवा, हिला आई म्हणायचे की वैरीण...अनैतिक संबंधासाठी काय हे?

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, December 21, 2013 - 15:41

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
बातमी मन सुन्न करणारी… कदाचित नात्यांवरचा विश्वास उडवून लावणारी. बातमी आहे पिंपरी चिंचवडमधल्या सांगवी मधली. अनैतिक संबंधांसाठी इथल्या एका विवाहित महिलेनं स्वत:च्या ११ वर्षांच्या मुलाला चक्क इस्त्रीचे चटके दिलेत. एवढ्यावरच ही निर्दयी आई थांबली नाही तर तिनं या मुलाला लाटण्यानं मारहाणही केली.

या लहानग्याच्या या जखमा पाहिल्यानंतर कुणाचंही मन हेलावेल. त्याला या जखमा दिल्यात त्याच्याच आईनेच. त्या लहानग्याला आपल्या आईचे अनैतिक संबंध समजले. त्यानं पतीला म्हणजेच वडिलांना हे सांगू नये म्हणून इतका अघोरी आणि हिंसक प्रकार त्याच्या आईनंच प्रियकराच्या मदतीनं केलाय.
पोलिसांनी क्रुर आईला आणि तिच्या प्रियकराला अटक केलीय. या क्रूर मातेला आणि तिच्या प्रियकराला शिक्षा मिळेलही. पण ११ वर्षांच्या चिमुरड्याच्या मनावर खोलवर झालेल्या जखमा भरणार कशा, असा प्रश्न परिसरातून विचारण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ

First Published: Friday, December 20, 2013 - 18:45
comments powered by Disqus