क्षुल्लक कारणावरून डोक्यात दगड घालून हत्या

By Jaywant Patil | Last Updated: Monday, December 31, 2012 - 18:43

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
मोठ्या भावाला शिवीगाळ केल्यानं चिडलेल्या लहान भावानं एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात घडली. राजेश भीमराव नवगिरे असं हत्या झालेल्या दुर्देवी तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी नाना उद्धव गायकवाड या 26 वर्षीय तरुणाला अटक केली.
सातत्यानं गुन्हेगारी घटनांमुळं हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडमध्ये वर्षाची अखेरही एका हत्येनंच झाली. रविवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अगदी शुल्लक कारणावरून हत्येची घटना घडलीय. नाना गायकवाड याचा मोठा भाऊ दयानंद हा वाढदिवसाची पार्टी साजरी करत असताना त्याचा राजेशसोबत शाब्दिक भांडण झालं.
त्यानंतर संतापलेल्या नानाने राजेशला जबर मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

First Published: Monday, December 31, 2012 - 18:43
comments powered by Disqus