डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना द्या श्रद्धांजली

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि `साधना` साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. ते सकाळी फिरायला गेले असत्या त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली.

सुरेंद्र गांगण | Updated: Aug 20, 2013, 03:41 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि `साधना` साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. ते सकाळी फिरायला गेले असत्या त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना तुम्हीपण श्रद्धांजली देऊ शकता. त्यासाठी खालील बॉक्समध्ये टाईप करा.

सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या `एक गाव- एक विहीर` या चळवळीत नरेंद्र दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ साली स्थापन झालेल्या `अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संमिती`मध्ये कार्य सुरू केले. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी `महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती`स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या `साधना`या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून संपादक होते.
या सार्‍या काळात डॉक्टरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना महाराष्ट्रातील गाव अन गाव पिंजून काढला. हजारो व्याख्यानं दिली. शेकडो शिबिरं घेतली. तितक्याच संख्येनं बुवाबाजी करणार्‍यांविरोधात वाद ओढवून घेतले आणि त्यांना समर्थपणे उत्तरंही दिली. असंख्य लेख आणि डझनभर पुस्तकं लिहिलीत.
महाराष्ट्रात जादूटोणा विधेयकाला अनेकांचा विरोध होता. मात्र, हे विधेयक व्हावे यासाठी दाभोलकर यांची इच्छा होती. जादूटोणा विरोधातील कायदा व्हावा यासाठी डॉ. दाभोलकर प्रयत्नशील होते. ७ जुलै १९९५ला युती शासनाने या विधेयक मांडले होते. मात्र, गेल्या १८ वर्षांपासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत विधेयक रखडलेले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ