एनडीए घोटाळा; सीबीआय चौकशी सुरू

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, September 18, 2012 - 19:21

www.24taas.com, पुणे
पुण्यातील एनडीए म्हणजेच ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’तील नोकर भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयनं चौकशी सुरु केली आहे.
याप्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप असलेले लेफ्टनंट जनरल जतिंदरसिंग यांची सीबीआयनं सोमवारी तब्बल दहा तास चौकशी केली. पुण्यातील आकुर्डी भागातील सीबीआयच्या मुख्यालयात आजही जतिंदरसिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. सीबीआयच्या अँन्टी करप्शन विभागाचे अधीक्षक राजकुमार व्हटकर यांनी जतिंदरसिंग यांच्या चौकशीला दुजोरा दिलाय. एनडीएतील `क` वर्ग श्रेणीच्या नोकर भरतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे. सीबीआयनं मागणी केल्यानंतर सरंक्षण मंत्री ए.के. अँण्टोनी यांनी लेफ्टनंट जनरल जतिंदरसिंग यांची जुलैमध्ये दुस-या विभागात बदली केली. जतिंदरसिंग यांचे एनडीएतील स्टाफ तसेच फिजीकल ट्रेनिंग ऑफीसर बरोबरच्या संबंधांबाबत सीबीआयने चौकशी केली.

First Published: Tuesday, September 18, 2012 - 19:21
comments powered by Disqus