'बाळासाहेब ठाकरे कलादालन' उभारण्याचा प्रस्ताव नामंजूर

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, February 20, 2013 - 21:21

www.24taas.com, पुणे
पुण्यातील गरवारे बालभवनच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचा स्थायी समितीने मंजूर केलेला प्रस्ताव पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामंजूर करण्यात आला आहे. वाढत्या विरोधामुळे हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.
बाजीराव रस्त्यावरील २ एकर जागेवर गरवारे बालभवन आहे. पुणे महापालिका आणि गरवारे ट्रस्ट च्या माध्यमातून गेली २७ वर्षे याठिकाणी हे बालभवन सुरु आहे. कला, क्रीडा, मनोरंजन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार घडवण्याचं काम बालभवन मार्फत चालते. रोज सुमारे ५०० हून जास्त मुलं या मैदानावर बागडत असतात. मात्र याकडं दुर्लक्ष करतं पुणे महापालिकेनं याठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं कलादालन उभारण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र याबाबत पुणेकरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानं पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

First Published: Wednesday, February 20, 2013 - 21:20
comments powered by Disqus