`एसपी कॉलेज' मैदानात धडाडणार राज ठाकरेंची तोफ?

जे बोलायचं ते ९ तारखेला बोलेन असं म्हणत राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेची उत्सुकता वाढवली. मात्र पुणे पोलिसांना सभेसाठी मनसे नेत्यांना परवानगी मिळत नसल्यानं स्थानिक नेत्यांची धावाधाव सुरु आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 5, 2014, 03:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
जे बोलायचं ते ९ तारखेला बोलेन असं म्हणत राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेची उत्सुकता वाढवली. मात्र पुणे पोलिसांना सभेसाठी मनसे नेत्यांना परवानगी मिळत नसल्यानं स्थानिक नेत्यांची धावाधाव सुरु आहे.
आता एसपी कॉलेज मैदानात राज ठाकरे यांनी सभा होण्याची शक्यता आहे. याबाबत एसपी कॉलेजच्या विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे. पुण्यात राजकीय पक्षांच्या सभा मुठा नदीच्या पात्रात होतात. पण सध्या तिथं मनोरंजन नगरी उभारण्यात आलीय. तिचा मुक्काम महिना-दीड महिना तरी हलणार नाही.
सभेसाठी दुसरा ऑप्शन म्हणजे अलका टॉकीज चौक असं होतं. पण या चौकात गेल्या कित्येक वर्षात राजकीय सभा झालेली नाही. या चौकातल्या सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळंच आता एसपी कॉलेजच्या मैदानावर राज यांची सभा होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.