<B> पाच रुपयांसाठी... विद्यार्थ्यांनं घेतला मित्राचा जीव! </b>

पिंपरी-चिंचवडमधली ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. केवळ पाच रुपयांसाठी शाळेत झालेल्या मारामारी दरम्यान पंधरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 21, 2013, 08:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पिंपरी-चिंचवडमधली ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. केवळ पाच रुपयांसाठी शाळेत झालेल्या मारामारी दरम्यान पंधरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडलीय. हृषिकेश सरोदे या १५ वर्षीय विद्यार्थ्याची त्याच्या वर्गमित्राबरोबर क्षुल्लक कारणावरुन मारामारी झाली. हृषीकेषच्या मित्रानं त्याच्याकडून एका प्रोजेक्टसाठी पंधरा रुपये घेतले होते. पण त्यानं फक्त दहाच रुपये परत केले. उरलेले पाच रुपये परत देण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये मारामारी झाली. यादरम्यान बाकावर डोकं आपटून हृषिकेशचा मृत्यू झालाय.

व्हिडिओ पाहा :

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.