`अजित पवारांना पैसा, सत्तेची मस्ती चढली आहे!`

By Jaywant Patil | Last Updated: Monday, July 29, 2013 - 07:35

www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
भारतीय जनता पार्टीच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदी पंकजा मुंडे यांची निवड झाल्यानंतर प्रथमच आज अहमदनगर मध्ये युवा निर्धार मेळावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना पंकज मुंडे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले. अजित पवार यांना पैशांची आणि सत्तेची मस्ती चढली असून ती मस्ती उतरवण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे या भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. काही काळापूर्वीच मुंडे कुटुंबातील गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे काकांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. अजित पवारांनी मुंडेंना दिलेल्या या दणक्यानंतर पंकजा मुंडेंनी पहिल्याच मेळाव्यात थेट अजित पवारांना आव्हान दिलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 28, 2013 - 21:22
comments powered by Disqus