तब्बल ५१ आरोपी गळाला; तुमचीही बाईक हरवलीय का?

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, December 9, 2013 - 17:54

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राबविलेल्या एका विशेष मोहीमेत तब्बल ५१ आरोपी पोलिसांच्या गळाला लागलेत इतकंच नाही तर त्यांच्याकडून अनेक बाईकसह २२ लाख २४ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय.
गेल्या काही दिवसांतील पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या गुन्हेगारीनं पोलिसांना हैराण करून सोडलं होतं.
त्यामुळे पोलिसांनी या विशेष मोहिमेची आखणी केली. त्यात आठ पोलीस अधिकाऱ्यांची पथकं तयार करण्यात आली होती. त्यांची गुन्ह्यांनुसार वर्गवारी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या गळाला तब्बल ५१ आरोपी लागले. या आरोपींनी ४६ गुन्ह्यांची कबुलीही दिलीय.
शिवाय या मोहिमेत पोलिसांनी झोपडपटट्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशनही केले. त्यात पोलिसांना विनय सहजीवनराम कुरमी आणि मच्छिंद्र बोबडे हे दोन तडीपार गुन्हेगारही सापडले आहेत. त्याचबरोबर मुंबई दारुबंदी कायद्याखाली पोलिसांनी एक लाख ११ हजार ८४० रुपयांचा मुद्देमालही जप्त केलाय. तसंच गेल्या ५२ दिवसांपासून पिंपरीमधून बेपत्त असलेल्या मुलीचादेखील पोलिसांना या मोहिमेत शोद लागला.
तुमचीही बाईक चोरीला गेली असेल तर तुम्हीही पोलिसांशी संपर्क जरूर साधा... कदाचित या सापडलेल्या मालात तुमच्याही बाईकचा समावेश असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Monday, December 9, 2013 - 17:54


comments powered by Disqus