‘हिंदू राष्ट्र सेने’च्या म्होरक्याला हत्येच्या गुन्ह्यात अटक

‘फेसबुक’ या सोशल वेबसाईटवर राष्ट्रपुरुषांची बदनामी करणारी छायाचित्रे दिसल्यानंतर पुण्याच्या हडपसर भागात मोहसिन शेख या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या झाली होती. याच हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेना या संघटनेचा म्होरक्य धनंजय देसाई याला अटक करण्यात आली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 11, 2014, 03:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
‘फेसबुक’ या सोशल वेबसाईटवर राष्ट्रपुरुषांची बदनामी करणारी छायाचित्रे दिसल्यानंतर पुण्याच्या हडपसर भागात मोहसिन शेख या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या झाली होती. याच हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेना या संघटनेचा म्होरक्य धनंजय देसाई याला अटक करण्यात आली.
मोहसिन शेख याची हत्या म्हणजे अनावधानानं झालेली हत्या नव्हती तर हा एक कटाचा भाग होता, असं समोर आल्यानंतर धनंजय देसाई याला अटक करण्यात आलीय. पोलिसांनी यापूर्वी, याच प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या १७ जणांना अटक केली होती.

फेसबुकवर महापुरुषांची बदनामी करण्याणत आल्याळनंतर पुण्यातत सलग तीन दिवस समाजकंटकांनी थैमान घातलं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील इतर भागांमध्येही दगडफेक, जाळपोळ, रास्तारोको, दुकानं आणि वाहनांवरचे हल्ले यांचं सत्र सुरु होतं. पोलीस परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगत होते. मात्र, प्रत्यनक्षात परिस्थिती वेगळी होती. हिंसक घटनांवर कोणाचंही नियंत्रण न राहिल्यााने परिस्थिती आणखी चिघळत गेली आणि हिंदू राष्ट्रर सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोहसिन शेख या मुस्लीम युवकाची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात देसाईला या गुन्ह्यांत अटक करण्यासाठी पोलिसांनी लष्कर कोर्टात परवानगीचा अर्ज केला होता. कोर्टाने परवानगी दिल्यावर मंगळवारी येरवडा जेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी त्याच्या अटकेची कार्यवाही पूर्ण केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.