पुण्यात विद्यार्थिनींचा `फॅशन का जलवा....`

जलवा... फॅशन का है ये जलवा ! ह्या गाण्याचे शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर येते ती म्हणजे लटकेबाज रॅम्पवॉक करणारी प्रोफेशनल मॉडेल कंगना राणावत...

Updated: Feb 5, 2013, 11:12 AM IST

www.24taas.com, पुणे
जलवा... फॅशन का है ये जलवा ! ह्या गाण्याचे शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर येते ती म्हणजे लटकेबाज रॅम्पवॉक करणारी प्रोफेशनल मॉडेल कंगना राणावत... पण पुण्यात मात्र असाच रॅम्पवॉक केला. पण तो फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनींनी. पुण्यात जगन्नाथ राठी व्होकेशनल गाइंडस एंड ट्रेनिंग सेंटरच्या वतीने एका फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
मात्र हा फॅशन शो थोडा आगळावेगळा होता. कारण रॅम्पवर अवतरलेल्या सौंदर्यवती कुणी प्रसिद्ध मॉडेल नसून या संस्थेत फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणी होती... रॅम्पवर अवतरेल्या या तरुणींच्या अदा प्रोफेशनल मॉडेललाही लाजवेल अशाच होत्या..
त्यांच्या फॅशनचा जलवा पाहून उपस्थितही थक्क झाले.... जगन्नाथ राठी व्हो.गाइंडस संस्थेत फॅशन शो रॅम्पवर तरूणी अवतरल्या आणि साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.. कारण की, ह्या मॉडेल नसूनही उत्तमरित्या मॉडेलिंगही करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. विद्यार्थिनी मॉडेल्सलाही लाजवेल अशा दिलखेचक अदा दाखवित रॅम्पवर फक्कड असा रॅम्पवॉक केला.