जाधवांचा शाही लग्न सोहळा : शाह कन्स्ट्रक्शनवर छापे

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, February 19, 2013 - 09:11

www.24taas.com, कराड, सातारा
भास्कर जाधव यांच्या मुलांच्या शाही लग्नाचा खर्च ठेकेदाराला भोवलाय. कराडच्या शाह कन्स्ट्रक्शनवर आयकर विभागानं छापे टाकलेत. शिवाय शाह कुटुंबीयांच्या मालकीच्या ‘हॉटेल पंकज’वरही छापे टाकण्यात आलेत.
शाह हा ठेकेदार कोयना धरणाशी संबधित आहे. या ठेकेदारानं भास्कर जाधव यांच्या लग्नाचा खर्च केल्याची माहिती होती. सूत्रांच्या माहितीनुसार, जाधवांच्या मुलाच्या लग्नाच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी हे छापे टाकण्यात आलेत.

विशेष म्हणजे, शाह कन्स्ट्रक्शन आणि आपले काहीही संबंध नाहीत, असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता.

First Published: Tuesday, February 19, 2013 - 09:05
comments powered by Disqus