राज ठाकरे घेणार मनसे नगरसेवकांची वार्षिक परीक्षा!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या नगरसेवकांची झाडाझडती घेणार आहेत. गेल्या वर्षभरात मनसेच्या नगरसेवकांनी काय कामं केली याची वार्षिक परीक्षाच राज ठाकरे घेणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 27, 2013, 10:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या नगरसेवकांची झाडाझडती घेणार आहेत. गेल्या वर्षभरात मनसेच्या नगरसेवकांनी काय कामं केली याची वार्षिक परीक्षाच राज ठाकरे घेणार आहेत. त्यासंबंधीचा एकत्रित अहवाल गटनेते वसंत मोरे यांनी तयार केलाय. त्याआधारावर मनसेच्या नगरसेवकांची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत त्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना आवर्जून विचारावेत असे काही प्रश्न झी २४ तासनं उपस्थित केले आहेत.
पुण्यातले मनसेचे नगरसेवक वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागलेत. आणि परीक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत खुद्द राज ठाकरे..... अशा वेळी राज ठाकरे त्यांच्या नगरसेवकांना फक्त अपेक्षित प्रश्न विचारणार की, पुणेकरांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या प्रश्नांचे बाउन्सरही टाकणार, याची उत्सुकता आहे. या अनुषंगानं झी २४ तासनं शहराच्या विविध प्रश्नांकडे राज ठाकरे यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.
औंधमधला सुतारद-यातला पाणीप्रश्न कधी सुटणार ?
घोले रोड, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व परिसरात पावसाळ्यातली पाणीकोंडी फुटणार का?
कोथरूडमधल्या गावठाणात रस्त्यांचं रुंदीकरण कधी होणार ? वॉर्डातला कचरा का उचलला जात नाही ?, चांदणी चौकाच्या नामांतरणाबाबत भूमिका काय?
वारजे - कर्वेनगरमधल्या नाल्यांवरची अतिक्रमणं का काढली गेली नाहीत ? मेट्रो स्टेशनसाठी जागा आहे का ?, पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान नागरिकांसाठी कधी खुले होणार?
*ढोले पाटील रोडवर मुलांना खेळायला मैदाने हेत का?
*नगर रोडवर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम कधी पूर्ण होणार? पाणी समस्या कधी मिटणार?
*संगमवाडी परिसरात रुगणालय उपलब्ध होणार का? शेती झोन चा प्रश्न कधी मिटणार?
भवानी पेठ वॉर्डातली अस्वच्छता कधी दूर होणार ? पार्किंगची समस्या मिटणार का?
कसबा पेठेत मोडकळीला आलेल्या जुन्या वाड्यांचं काय करणार?
टिळक रोडवरच्या धोकादायक जुन्या वाड्यांचा प्रश्न कधी मिटणार ?
सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय- नाल्यांवरचं अतिक्रमण, तळजाई- वाघजाई वरची वृक्षतोड अजून का थांबत नाही?
बिबवेवाडीत आठ वर्षांपासून प्रलंबित अण्णाभाऊ साठे स्मारकाचं काम कधी पूर्ण होणार?
धनकवडीमधलं अनधिकृत बांधकामं कधी थांबणार ?
हडपसरमध्ये बीआरटीचे बळी कधी थांबणार?
या सगळ्या जोडीला वाहतुकीची समस्या, रस्त्यांवरची अतिक्रमण, पाणीगळती अशा अनेक समस्या पुण्यात ठाण मांडून आहेत,. नगरसेवकांचं प्रगतिपुस्तक तपासताना राज ठाकरे त्यांच्या नगरसेवकांना हे सगळे प्रश्न विचारणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.