महाराज! तुमचा राजगड खचतोय! Rajgad decaying

महाराज! तुमचा राजगड खचतोय!

महाराज! तुमचा राजगड खचतोय!
www.24taas.com, झी मीडिया, राजगड

शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्याचा गड म्हणजे, किल्ले राजगड...मात्र या राजगडाचीही इतर किल्ल्यांप्रमाणे दुरवस्था झालीय. राजगडाच्या पाल दरवाज्याच्या बाजूचा रस्ता पावसामुळे खचलाय.

गडाच्या पाय-या तसेच बुरुज मोठ्या प्रमाणावर ढासळले आहेत. त्यामुळं गडावर चढणं धोक्याचं बनलय. पुरातत्व खात्याला या सगळ्याची कल्पना असूनही सरकारी पातळीवर काहीच कार्यवाही होत नाहीये. अशा परिस्थितीत महाराजांच्या शौर्यशाली इतिहासाचं प्रतिक असलेला हा किल्ला जोपासण्यासाठी स्थानिक शिवभक्त पुढे सरसावले आहेत.

येत्या शनिवारी आणि रविवारी श्रमदानातून हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम केलं जाणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 04, 2013, 21:24


comments powered by Disqus