सेक्स रॅकेट : कोण आहे ही कल्याणी देशपांडे

पुण्यातल्या पाषाण सुस रोडवर राहणाऱ्या ५० वर्षीय कल्याणी देशपांडे हिचा मुख्य व्यवसाय आहे वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 11, 2013, 08:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातल्या कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडेच्या आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. ती चालवत असलेलं एक हाय प्रोफाईल सेक्स रेकेट पुणे पोलिसांनी उघडकीस आणलंय. त्यामध्ये शहरात वेश्या वयवसाय करणाऱ्या दोन विदेशी आणि दोन मुंबईतल्या मुलींसह एका एजंटला - कल्याणी देशपांडेला अटक करण्यात आलीय.
पुण्यातल्या पाषाण सुस रोडवर राहणाऱ्या ५० वर्षीय कल्याणी देशपांडे हिचा मुख्य व्यवसाय आहे वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणं... दिसायला सुसंस्कृत आणि सुशिक्षित वाटत असलेली ही महिला मानवी तस्करीमध्ये अट्टल गुन्हेगार आहे. अनैतिक कामासाठी महिलांचा वापर करण्यामध्ये ती माहीर आहे. कल्याणी देशपांडे पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवते. सामाजिक सुरक्षा शाखेनं या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. पुण्याच्या भुसारी कॉलनीतल्या एका इमारतीमध्ये हा व्यवसाय सुरु होता. एक डमी गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत मुंबईतल्या दोन तर उझबेकिस्तानातल्या दोन मुलींना अटक करण्यात आलीय.
कल्याणी देशपांडेचा हा अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा नाही, अनैतिक व्यापाराप्रकरणी तिला २००० साली पहिल्यांदा अटक झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत तिच्यावर खुनाच्या दोन गुन्ह्यांसह तब्बल २१ गुन्हे दाखल आहेत.

२०१० साल वगळता दर वर्षी किमान एक तरी गुन्हा कल्याणी देशपांडेवर दाखल आहे. मात्र, धक्क्कादायक बाब म्हणजे यापैंकी एकाही खटल्याचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही. त्यामुळे तिला अजून एकदाही शिक्षा झालेली नाही. तिच्या विरोधातले खटले न्यायालयात प्रलंबित राहत असल्यानेच ती पुन्हा पुन्हा असे गुन्हे करू शकते. अशा परिस्थितीत केवळ अटक करणं किंवा फारतर तडीपार करणं, यापलीकडची कारवाई पोलीस करू शकत नाहीत. जामिनावर सुटताच कल्याणीचा गोरखधंदा पुन्हा सुरु होतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.