शहीद मानेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री अनुपस्थित

By Surendra Gangan | Last Updated: Friday, August 9, 2013 - 08:00

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही मानेंच्या अंत्यसंस्कारावरून राजकारण सुरू झालंय.शहीद कुंडलीक माने यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित होते. याच मुद्यावर बोट ठेवत राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.
कुंडलिक माने यांच्या अंत्यसंस्काराला गृहमंत्री आर. आर. पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदार उपस्थित होते. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येथे फिरकलेच नाहीत. यामुळे जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनी मानेंच्या अंत्यसंस्काराला हजर राहायला हवे होते, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणलाय. पाकच्या नापाक हल्ल्यामुळं सीमेवर देशाचे पाच जवान धारातिर्थी पडले आहेत.
कुंडलिक माने यांच्या पार्थिवाला त्यांच्या लहान मुलगा अमोल याने मुखाग्नी दिला आणि पिंपळगाववासीयांच्या अश्रूंना बांध फुटला. वीर पुत्राला अखेरचा निरोप देताच संपूर्ण गावच शोकसागरात बुडाले. अत्यंत शोकाकूल वातावरणात आणि शासकीय इतमामात मराठा रजिमेंटचे नायक कुंडलिक माने यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारत माता कि जय, वंदे मातरम्, अमर रहे अमर रहे कुंडलिक माने अमर रहे या हृदयाला भिडणार्‍या घोषणा आणि बंदुकीच्या फैरींची सलामी देत या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद माने यांचा लहान मुलगा अमोल, भाऊ विजय आणि वडिलांनी मुखाग्नी दिला.
सारा देश शोकात डुबलेला असताना संवेदनशीलता दाखवून जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्याऐवजी राजरकारणी एकमेकांना लक्ष्य करण्यात गुंतलेले असल्याने चिड व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 9, 2013 - 07:57
comments powered by Disqus