सोशल मीडीयावर अफवा, पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर पडसाद

सोशल नेटवर्किंग साईटवर आक्षेपार्ह आणि संतापजनक पोस्ट टाकल्याने याचे पडसाद पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर दिसून आले आहेत. काहींनी या हायवेवर वाहने रोखून धरल्याने काहीकाळ महामार्गावरील वाहतूक खोळंबळी होती. दरम्यान, पुणे, साताऱ्यामध्ये बंद पाळण्यात आलाय. मात्र, ही पोस्ट अफवा असल्याचे पुढे आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 1, 2014, 07:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
सोशल नेटवर्किंग साईटवर आक्षेपार्ह आणि संतापजनक पोस्ट टाकल्याने याचे पडसाद पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर दिसून आले आहेत. काहींनी या हायवेवर वाहने रोखून धरल्याने काहीकाळ महामार्गावरील वाहतूक खोळंबळी होती. दरम्यान, पुणे, साताऱ्यामध्ये काही ठिकाणी बंद पाळण्यात आलाय. मात्र, ही पोस्ट अफवा असल्याचे पुढे आले आहे.
बजरंग दल आणि संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला. महापुरुषांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने या निषेध म्हणून मार्ग रोखून धरला. सोशल मीडीयावर अफवा पसरवली जात आहे. ही बातमी खोटी असून ही बदनामी करणारी माहिती आहे. अफवा पसरवत आहेत. सर्वांना कळकळीची विनंती आणि आवाहन आहे कृपया शांतता राखा, तरी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या राज्यात अनेक ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण झाल्याचीही माहिती हाती येत आहे. सोशल मीडियावर दंगलीला प्रोत्साहन देणारे मॅसेज व्हायरल होत आहेत. कृपया आपला संयम आणि विवेक ढळू देऊ नका. एकमेकांच्या मालमत्तेचं आणि जिविताचं नुकसान करुन काहीच हाती लागणार नाही. ज्या विकृत उद्देशाने हे करण्यात आलंय तो उद्देश सफल होऊ देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
एक दोन सडक्या, विकृत मेंदूनी केलेल्या घाणेरड्या कृत्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणे आपल्या एकूण समाजाला, राज्याला परवडणारे नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या राजाने बुद्धीच्या जोरावर स्वराज्य स्थापन केलं त्या माझ्या राजाचे सैनिक कुणाच्याही विकृत कांगाव्याला बळी पडता कामा नये!!! भावांनो कुठेही दंगल, धार्मिक वाद होऊ नये याची काळजी घ्या. शिवरायांचे मावळे शिवरायांप्रमाणे बुद्धीने लढणारेच असले पाहीजे!! , असा शांततेचा मेसेजही आता फिरत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.