श्रुतिका स्केटिंग मास्टर, लिम्काबुकमध्ये विक्रमाची नोंद

श्रुतिका चंदवानी ही मूळची कोल्हापूरची. श्रुतिका (२२) ही स्केटिंगमध्ये मास्टर होती. तिच्या विक्रमाची नोंद लिम्काबुकमध्ये करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 8, 2013, 04:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
पुण्याहून गोव्याला पिकनिकसाठी निघालेले तीन मित्र आणि एक मैत्रिण पाच दिवसांपासून बेपत्ता होते. त्यातील चिंतन बूच याचा मृतदेह नीरा सापडल्याने घातपाताची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, त्यांची कारच नदीत मिळाल्यानंतर त्याला पूर्णविराम मिळाला. हा अपघात असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान गाडीमध्ये तिघांचे मृतदेह सापडले. त्यापैकी श्रुतिका चंदवानी (२२) ही स्केटिंगमध्ये मास्टर होती. तिच्या विक्रमाची नोंद लिम्काबुकमध्ये करण्यात आली आहे.
श्रुतिका ही मूळची कोल्हापूरची. ती महर्षिनगर येथे राहत होती. पिकनिकला निघालेले हे मित्र एका जाहिरात एजन्सीमध्ये नोकरी करीत होते. दरम्यान, श्रुतिका हिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. तिने तसे घरीही कळविले होते. मी कोल्हापूरला येत आहे, असे तिने फोनवरून घरी माहिती दिली.
मात्र, श्रुतिका अजून आली नाही म्हणून घरचे काळजीत होते. त्यांची काळजी दुर्दैवाने खरी ठरली. ती बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्याचदरम्यान चिंतन बूच याचा मृतदेह नीरा सापडल्याने काळजीत अधिक भर पडली. नीरा नदीत कार कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला.
श्रुतिकाच्या जाण्याने कोल्हापूकर हळहळलेत. स्केटिंगमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या श्रुतिकाने १९९७मध्ये २२ मोटारींखालून लिम्बो स्केटिंग करून लिम्का बुकमध्ये नोंद केली. या विक्रमानंतर तिने न्यूयॉर्कमध्ये ३१ मोटारींखालून लिम्बो स्केटिंगचाही विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close