लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाची आत्महत्या...

पिंपरी-चिंचवडमधल्या भोसरी भागात प्रेमीयुगुलानं आत्महत्या केलीये. विवाहाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

Updated: Mar 26, 2013, 02:01 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडमधल्या भोसरी भागात प्रेमीयुगुलानं आत्महत्या केलीये. विवाहाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. इतिश्री स्वाईन आणि राजमुकर स्वाईन अशी दोघांची नावं आहेत. गेल्या सात दिवसांपासून ते सोबत राहत होते.
राजकुमारने सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास वडिलांना आत्महत्या करत असल्याचा एसएमएस केला होता, असं पोलीस तपासणीत समोर आलंय. दरम्यान ही आत्महत्या आहे की प्रियकराने प्रेयसीचा खून करुन आत्महत्या केली असावी याबाबतचा तपास पोलीस घेत आहेत.

दोघेही आसामचे नागरिक आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करतायेत. राजकुमार हा सिंहगड इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी असल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमारचे कुटुंबीय आसाम येथे उत्सवासाठी गेलेत. त्यामुळे 19 मार्चला त्याची प्रेयसी ईतीश्री त्याच्याकडे आली होती.