मनसेचा महाआरतीद्वारे पोलिस कारवाईचा निषेध

पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांवर केलेल्या या कारवाईच्या विरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करुन पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.

Updated: Oct 2, 2011, 01:04 PM IST

[caption id="attachment_526" align="alignleft" width="300" caption="मनसेचा महाआरतीद्वारे पोलिस कारवाईचा निषेध"][/caption]

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला तो पुण्यामध्ये. तेव्हापासून पुण्यातील गणेशोत्सव हा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरत आला आहे. यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात मोठ्या थाटात साजरा झाला. मात्र, यंदाची विसर्जन मिरवणूक गाजली ती वेगळ्या कारणाने.

 

रात्री 12 नंतर वाद्य वाजवणं, ध्वनी प्रदूषण करणं तसेच बैलगाड्या वापरणं यांसारख्या   विविध कारणांमुळे पुण्यातील 72 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दगडूशेठ हलवाई, मंडईसह अनेक मंडळांवर यासंदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांवर केलेल्या  या कारवाईच्या विरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

 

मनसेने दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करुन पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. सुमारे दिडशे ते दोनशे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पोलिसांच्या कारवाईचा सर्वपक्षीय आमदारांनी आधीच निषेध केला आहे. पोलिस कारवाईविरोधात मंडळांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. पोलिसी कारवाईविरोधात पुण्यातील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोर्टात जाण्याचीही तयारी केली आहे. शिवाय केसरीवाडा ते मंडईपर्यंत महामोर्चाही काढण्यात येणार आहे.