राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण शिगेला

पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण शिगेला पोहचलंय. अजितदादांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी यांचं नाव जवळपास निश्चित झालय असं असताना पिंपरी-चिंचवडमधल्या तिनही आमदारांनी जगदीश शेट्टी यांच्या विरोधात मोर्चे बांधणी केल्यानं चित्र बदलल आहे.

Updated: Apr 5, 2012, 07:10 PM IST

www.24taas.com, पिंपरी चिंचवड

 

पिंपरी चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण शिगेला पोहचलंय. अजितदादांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी यांचं नाव जवळपास निश्चित झालय असं असताना पिंपरी-चिंचवडमधल्या तिनही आमदारांनी जगदीश शेट्टी यांच्या विरोधात मोर्चे बांधणी केल्यानं चित्र बदलल आहे.

 

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी  राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. मात्र महापौर मोहिनी लांडे यांना शेट्टी त्रासदायक ठरतील आणि पालिकेच्या आर्थिक नाड्या शेट्टी यांच्या हातात जातील या भीतीनं त्यांच्या नावाला विरोध होऊ लागलाय. त्यामुळेच मोहिनी लांडे यांचे पती आमदार विलास लांडे यांनी नवनाथ जगताप या नवख्या उमेदवारासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. तर आमदार लक्ष्मण जगताप आणि अण्णा बनसोडे यांनीही शेट्टी यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे.

 

 

जगदीश शेट्टी हे आझम पानसरे यांच्या यांच्या गटातले आहेत. त्यातच ते अजित पवारांच्याही जवळचे आहे. त्यांची शक्ती महापौरांसाठी त्रासदायक ठरू शकते त्यामुळेच त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरूंय. अर्थात कुणी कितीही ताकद लावली तरी शेवटी अंतिम निर्णय हा अजित पवारांच्या हाती आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडेच सा-यांचं लक्ष लागल आहे.