मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांची कुरघोडी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातल्या कुरघोडीचं राजकारण शिगेला पोहचलंय. त्याचा प्रत्यय पिंपरी चिंचवडमध्येही यायला लागलाय. पिंपरीत प्रस्तावित International Convention and Exhibition Center वरुन दोन्ही पक्षांमध्ये सामना रंगलाय.

Updated: May 10, 2012, 10:00 PM IST

www.24taas.com, पुणे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातल्या कुरघोडीचं राजकारण शिगेला पोहचलंय. त्याचा प्रत्यय पिंपरी चिंचवडमध्येही यायला लागलाय. पिंपरीत प्रस्तावित  International Convention and Exhibition Center वरुन दोन्ही पक्षांमध्ये सामना रंगलाय.

पिंपरी चिंचवडमधल्या मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि आशियातलं सर्वात मोठं International Convention and Exhibition Center उभारण्याचा गाजावाजा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला. तब्बल २४० एकरवर उभारल्या जाणा-या या प्रकल्पाला  मुख्यमंत्र्यांनी सूत्र हाती घेताच मंजुरी दिली. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड नव नगर प्राधिकरण संयुक्तपणे हा प्रकल्प राभावाणार होतं. त्यासाठी एक कंपनीही उभारण्यात आली. पण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर  राष्ट्रवादी कॉँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही कंपनीच  बरखास्त केली. आणि संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी प्राधिकरणावर ढकलून दिली. पाचशे  कोटींहून जास्त खर्च असलेला  हा प्रकल्प प्राधिकरण उभारू शकेल का, अशी चर्चा असतानाच हा प्रकल्प उभारला जाणारच असा पवित्रा अजित पवारांनी घेतलाय.

अजित पवार यांच्या पाठिंब्यानंतर पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणानंही हा प्रकल्प स्वबळावर उभा करू असं म्हंटलंय. पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांचा असलेला दबदबा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सरसावले असले तरी 'पिंपरीतला हा प्रकल्प उभारुच' असा पवित्रा घेत  उपमुख्यमंत्र्यांनी सध्या तरी  बाजी मारलीय.