उदयनराजेंचं स्वप्न : शरद पवार पंतप्रधानपदी!

‘शरद पवार यांना येत्या काळात पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न आहे’ असं मत खासदार उदयराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 26, 2013, 09:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
‘शरद पवार यांना येत्या काळात पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न आहे’ असं मत खासदार उदयराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. सातारा इथल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. उदयनराजे पक्ष बदलणार असल्याची चर्चा अनेक वेळा समोर आली. मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं उदयनराजेंनी सांगितलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधकांचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाड यांची भाषा घसरली. जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांचा चक्क बैल म्हणून उल्लेख केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.
आता त्या दोन ‘बैल’गाडीतून काय घेऊन गेले, त्या बद्दल मला बोलायचे नाही. असे म्हणून त्यांनी पुन्हा जयंत पाटीलांना साक्षीदार ठेवले, आणि म्हणाले, काय जयंत पाटील ते दोन ‘बैल’गाडीतून काय घेऊन गेले त्याच्याबद्ल आम्हांला काहीच बोलायचे नाही, अशा प्रकारची भाषा जितेंद्र आव्हाड यांनी वापरली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.