उदयनराजेंचे पिस्तुल फोटोसेशन व्हॉट्स अॅपवर, अडचणीत वाढ

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरक्षारक्षकाची बंदूक घेऊन फोटो सेशन केल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षारक्षक चांगलेच महाग पडले आहे. त्याची सेवा खंडीत करण्यात आली असून त्याची बढतीही रोखली गेली आहे.

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरक्षारक्षकाची बंदूक घेऊन फोटो सेशन केल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षारक्षक चांगलेच महाग पडले आहे. त्याची सेवा खंडीत करण्यात आली असून त्याची बढतीही रोखली गेली आहे.
उदयनराजे यांनी सुरक्षारक्षकाचे पिस्तुल घेऊन केलेले फोटोसेशन व्हॉट्स अॅपवर फिरले. या फोटोंमुळे, जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक के प्रसन्ना यांनी याबाबतची गंभीर दखल घेतली आहे. आणि त्यांचे सुरक्षारक्षकही अडचणीत आलेत. उदयनराजेंनीही सुरक्षा रक्षकाचा गैरवापर केला. त्यामुळे त्यांना सुरक्षा देऊ नये, असा अहवाल, प्रसन्ना यांनी वरिष्ठ पोलीसांकडे पाठवला आहे.
सुरक्षा रक्षक विनोद माने यांची पगारवाढ दोन वर्ष थांबवली आहे. याशिवाय यापुढे कोणत्याही व्हीआयपी लोकांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यापासून रोखण्यात आलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा>