डोक्यात धोंडा पडल्यावर अजितदादांना कळेल- उदयनराजे

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, October 18, 2013 - 22:01

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
‘अजित पवार यांनी मला खड्यासारखे बाजूला करण्याची भाषा केली आहे. मात्र, मी खडा नसून त्यांच्या रस्त्यातला धोंडा आहे. हा धोंडा डोक्यात बसला तर मग समजेल,’ अशा शब्दांत साता-यातील राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत आपल्याच पक्षातील नेते अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
उदयनराजे भोसले हे राष्ट्रषवादीचे खासदार असले तरी त्यांनी आजवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य कोणत्याच नेत्याला महत्त्व दिलेले नाही. आता निवडणुकाजवळ आलेल्या असताना त्यांनी पुन्हा आपल्याच नेत्यांवर जाहीर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सहकारी साखर कारखाना खरेदीत घोटाळा करणा-यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर अजित पवार यांनी ‘सहकार क्षेत्रास कलंक लावणारी मंडळी आम्ही खड्यासारखी बाजूला काढू तसेच उदयनराजेंना समजावून सांगू,’ अशी प्रतिक्रिया दिली होती.
सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. लोकप्रतिनिधी, गुन्हेगार व पोलिस यांच्यात संगनमत असल्याने गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, October 18, 2013 - 22:00
comments powered by Disqus