राज्याचं डिझाइन बदलायचं असेल तर.... – राज ठाकरे

By Prashant Jadhav | Last Updated: Saturday, August 31, 2013 - 21:49

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
डिझाइन हे केवळ साड्या, दागिने, कपडे यांच्यासाठीच नसतं तर ते आपल्या सार्वजनिक जगासाठीही असतं. तुम्हांला बाहेरचाही तोच विचार केला पाहिजे. राजकारणातील सर्वांचे बंगले, फार्म हाऊस हे कसे चांगले असतात. त्यांना बाहेरचं विश्व का करावसं वाटत नाही. मी हे बोलू शकतो कारण माझ्या हातात सत्ता नाही, मी द्या असं सांगायला आलो नाही. समाजाचं डिझाइन बदलायचं असेल तर त्या डिझाइनमध्ये तुम्ही आले पाहीजे, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष आणि आज पुरते झालेल्या राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केलं.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या एम्फी थिएटरमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जगन्नाथ राठी इन्स्टिट्यूटमधील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थांच्या पदवी प्रदान समारंभात ते उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी पत्रकारांना काही मसाला मिळणार नाही असं सांगितले. पण आपल्या खास शैलीत बिहारवर टीका करायला ते विसरले नाही. बिहारमध्ये काही चांगल्या गोष्टी आहे. जसं नालंदा विद्यालय. पण आता काय स्थिती आहे त्या विद्यापीठाची. आता काय अतिरेकी तयार होत आहेत. का तिथे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांना हात घालून विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडले. शालेय शिक्षणात चित्रकला हा पर्यायी विषय असतो. तर तुम्ही कुठून शिकणार डिझाइन शिकणार असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. एखादया गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपण लहानपणापासूनच बदलला पाहिजे. आपल्याकडे परदेशातील उदाहरण दिलं की म्हणतात यांना परदेशातील कौतुक आपल्या लोकांनी भरपूर केलं आहे. आणि आपल्या लोकांचं कौतुक केलं तर परदेशात काय केलं यांना काय माहिती अशी डबल डोलकी वाचवली जाते. ब्रिटीशांनी बांधलेल्या वास्तु आजही जशाच्या तशा आहे. आणि आपल्या पाहा. मंत्रालय, शासकीय विश्रामगृह पाहा, सार्वजनिक शौचालय पाहा.... कोणी विचारलं की कुठे आहे सार्वजनिक शौचालय ते वासावरून कळतं... अरे ज्या गोष्टी करायला जायचं असतं त्याच होत नाही. आपल्याकडे अथेटिक सेन्स नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
इतर राज्यातील रस्ते पाहा आणि आपल्याकडील पाहा..... गाडी चांगली चालू असेल आणि अचानक हालायला लागली की कळतं आला महाराष्ट्र...अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली....
आज फर्ग्युसनचा कॅम्पस आहे, तसा आपल्या उभा करता येईल का, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केला, त्यावेळी सर्वांनी नाही असं उत्तर दिलं. त्यावर राज ठाकरे म्हणाले, तुमच्याकडून हो असं उत्तर यायला पाहिजे. तुम्हीही असं भव्य दिव्य घडवू शकतात अशी भावना राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवली.
सर्व काही वेल डिझाइन पाहिजे. मी का सांगतो आहे. की आपण घरातून बाहेर पडल्यावर आपल्याला आनंद व्हायला हवा. आपल्याला जगावंस वाटलं पाहिजे. मला काही चांगली झाडं दिसली पाहिजे, चांगले फुटपाथ दिसले पाहिजे. या कोणत्याच गोष्टी दिसत नसतील तर नुसत्या सरकारला शिव्या घालून काही होणार नाही आहे. या राज्याचं डिझाइन बदलायचं असेल आपल्याला.... तर तुम्हांला त्याच्यात यावं लागेल. नुसता हा बाहेरून तमाशा नाही चालणार.... माझी अवस्था कडक लक्ष्मी सारखी असते. आम्ही स्वतःला फटके मारून घेत असतो. आणि बाजूला टाळ्या वाजवणारे असतात.... त्यामुळे आत आल्याशिवाय काही होणार नाही, असेही त्यांनी नमूद केलं.
ब्रिटीश भारतात होते. त्यांनी जे स्ट्रक्चर बनवले तसे आपल्या का बनवता आले नाही. कारण आपल्याकडे इच्छा शक्तीच नाही. आपल्याकडचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड काय असतात, एकतर लांब मिशा वाढवलेला माणूस.... नखं वाढवलेला माणूस... किंवा सर्वाधिक मुलांचा बाप.... या रेकॉर्डच्या पुढे आपण का जात नाही. तर रोजच्या जगण्याच्या गरजा आपण पूर्ण करू शकत नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 31, 2013 - 21:43
comments powered by Disqus