पिंपरीत तलवारी घेवून नंगा नाच, १९ जण ताब्यात

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये कायदा सुव्यस्था आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून ५० ते ६० जणांच्या तरुणांनी थेरगाव मध्ये क्रांतीनगर परिसरात तलवारी घेवून नंगा नाच केला. अनेक वाहनांची तोड फोड केली. महिलांनाही मारहाण कऱण्यात आलेय. या प्रकरणी पोलिसांनी १९ जणांना ताब्यात घेतलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 4, 2014, 07:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये कायदा सुव्यस्था आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून ५० ते ६० जणांच्या तरुणांनी थेरगावमध्ये क्रांतीनगर परिसरात तलवारी घेवून नंगा नाच केला. अनेक वाहनांची तोड फोड केली. महिलांनाही मारहाण कऱण्यात आलेय. या प्रकरणी पोलिसांनी १९ जणांना ताब्यात घेतलंय.
थेरगावमध्ये अभिजित बारणे या तरुणाचं एका अज्ञात व्यक्तीशी भांडण झालं. त्यानंतर काही वेळानं थेरगावमधल्या क्रांतीनगर भागात जवळपास ५० ते ६० जणांच्या तरुणांनी तलवारी नाचवत धुमाकूळ घातला. अभिजित बारणे याच्या घरात घुसून तोडफोड केली. त्याचबरोबर परिसरातल्या अनेक वाहनांचीही तोडफोड केली.
एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी गणेश जयंतीच्या कार्यक्रमात घुसून महिलांनाही मारहाण केली. दुसरीकडे ज्या तरुणांनी हा धुमाकूळ घातला ते राकेश भरणे गटाचे असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणी १९ तरुणांना अटक केलीय तर जवळपास ४० दुचाकी जप्त केल्यात.
पोलीस या प्रकरणी राकेश भरणे आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतायत. पिंपरी चिंचवडसारख्या शहरात घडलेल्या या घटनेनं नागरिक मात्र हवालदिल झालेत. या प्रकारानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.