राज ठाकरे यांची फटकेबाजी

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच भारत-पाक संबंधांवर त्यांनी कडवट टीका केली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 15, 2013, 08:17 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच भारत-पाक संबंधांवर त्यांनी कडवट टीका केली.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली – राज
- सीमेवर पाकचा धिंगाणा चालला असताना क्रिकेट सामने आणि अमन की आशा हे कार्यक्रम कशासाठी ? – राज
- जे जवान शहीत होत आहेत, त्यांच्यासाठी भविष्यात काय सरकार करते – राज
- सीमेवरील जवानांचा खेळ चाललाय. दोन दिवस सहानभुती दाखवायची, हेच सरकारचे धोरण आहे – राज
- यापुढे काही घडले तर पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगणारे सिंग आधी घडलंय त्याकडे बघा -राज ठाकरे
- लष्करप्रमुख विक्रम सिंग यांच्यावर राज ठाकरे यांनी घेतले तोंडसुख
- भारत-पाक मुद्द्याचे राजकारण केलं जात आहे. दुसऱ्या विषयाकडे लक्ष वळविले जात आहे - राज ठाकरे
- बांग्लादेशी लोक झोपड्यात राहत आहेत. त्यांच्या झोपड्या जाळून त्यांना पक्की घरे दिली जातात –राज
- अनधिकृत रिक्षा-टॅक्सींवर कारवाई होत नाही, सरकार निष्काळजी आहे - राज ठाकरे
- मुंबईत अनधिकृत रिक्षा-टॅक्सी फिरत आहेत – राज
- फेरीवाल्यांबाबत राष्ट्रपतींकडे प्रस्ताव कशाला? काय चालंलय नक्की - राज ठाकरे
- राज्यातील शहरांवर मराठी माणसांचा पहिला हक्क – राज
- ढोबळेंवर कारवाई मात्र, परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई का नाही - राज ठाकरे
- माझ्या हातात सत्ता द्या, कायद्याचे राज्य कसे असते दाखवून देतो - राज ठाकरे
- परप्रांतीय फेरीवाल्यांना राज ठाकरे यांनी दिलाय दम
- मराठी फेरीवाल्यांच्या जागा अमराठी फेरीवाले बळकावत आहेत – राज
- फेरीवाल्यांनी मोर्चा काढला तर मनसे रस्त्यावर उतरेल, हे लक्षात ठेवा - राज ठाकरे
- मतांचा टक्का वाढविण्यासाठी सर्व राजकारण सुरू आहे – राज
- मोर्चा काढलात तर त्याच दिवसापासून मनसे फुटपाथवर काय करते ते पाहा - राज ठाकरे
- पोलिसांविरोधात, महापालिकेविरोधा मोर्चो काढून दाखवाच – राज

- फेरीवाल्यांनी मोर्चा काढून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही – राज
- राष्ट्रवादीची ढोंगबाजी सुरू आहे – राज
- गृहमंत्री राष्ट्रवादीचे असताना मुख्यमंत्री ढोबळेंची बदली करू शकतात? - राज ठाकरे
- सिंचन श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांनी काढण्यास सुरूवात केली तेव्हा राष्ट्रवादीचे मंत्री कसे देतात – राज
- ढोबळे यांची बदली मुख्यमंत्र्यांनी केली हे आर आर सांगतात हे केवळ नाटक आहे - राज ठाकरे
- पोलिसांचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे – राज
- सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांची बदलीमागे पोलिसांचे खच्चीकर सुरू – राज
- कोकणातही सभा घेणार – राज
- सोलापूर-जालन्यातही घेणार सभा – राज
- १२ तारखेला कोल्हापुरात सभा
- ११ तारखेला सांगलीत घेणार सभा - राज ठाकरे
- साताऱ्यापासून दौऱ्याला सुरूवात – राज
- राज ठाकरे १० फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
- राज ठाकरे आगामी महाराष्ट्र दौरा करणार