राज ठाकरे हाजीर हो..., raj thackeray will appeared in jalgaon court

राज ठाकरे हाजीर हो....

राज ठाकरे हाजीर हो....

www.24taas.com, जळगाव
राज ठाकरेंची आज जळगाव कोर्टात हजेरी आहे. 1 फेब्रुवारी रोजी बजावलेल्या समन्सनंतरही राज ठाकरे कोर्टात गैरहजर राहिल्यानं त्यांना 8 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर राहिण्याचे आदेश देण्यात आले होते.

उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी 12 जानेवारी 2009 मध्ये रत्नागिरीतल्या खेडमध्ये राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिका-यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता.

याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रदेश सरचिटणीस अँड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव या पदाधिका-यांवर गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात राज ठाकरे वगळता तिघांची जामीनावर सुटका झाली आहे. आज सर्व जण कोर्टात हजर राहणार आहेत.

First Published: Monday, April 08, 2013, 10:13


comments powered by Disqus