राज ठाकरेंना जामीन मिळाला पण.....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारी जळगाव कोर्टात हजर होते. रेल्वे भरती प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर जळगावमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Updated: Apr 9, 2013, 05:28 PM IST

www.24taas.com, जळगाव
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारी जळगाव कोर्टात हजर होते. रेल्वे भरती प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर जळगावमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचप्रकरणी राज ठाकरेंना सोमावारी कोर्टात हजर राहावं लागलं होतं. राज यांना सोमवारी जळगावच्या न्यायालयात तब्बल ५६ मिनिटे न्यायाधीशांच्या आदेशाची प्रतीक्षा करत सामान्य आरोपीप्रमाणे उभे राहावे लागले.
मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, यासाठी मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद २१ ऑक्टोबर २००८ रोजी संपूर्ण राज्यासह जळगावतही उमटले होते.
याप्रकरणी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात वॉरंट बजावल्याने ठाकरे यांची सोमवारी न्यायाधीश ए. बी. होडावडेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने राज ठाकरेंना १५ हजारांचा जामीन मंजूर केला. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली.