खडसेंचा राज ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल

Last Updated: Tuesday, March 12, 2013 - 14:07

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत उत्तर दिलं आहे. आपण बाहेर काढलेल्या प्रकरणांमुळे अनेक बिल्डर दुखावले गेले आहेत. आपल्यावर होत असलेल्या आरोपांमागे हे बिल्डर्स असू शकतात, असं खडसे म्हणाल आहेत. आपल्यावर केलेल्या सेटलमेंटच्या आरोपांची मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची समिती नेमून चौकशी करा, असं असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
राज यांच्या आरोपांना विधानसभेतच खडसेंनी उत्तर दिली आहे. माझ्यावर आरोप होत आहेत कारण की, मी काढलेल्या प्रकरणामुळे बिल्डर लॉबी दुखावलेली आहे. आणि त्यामुळेच माझ्यावर अशाप्रकारचे आरोप होत आहेत. असं म्हणत खडसेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना टोला हाणला आहे.

तर याआधीही खडसेंनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले होते. राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत त्यांनी पटलवार केला होता. पत्रकार परिषदेत राज यांनी खडसेंवर आरोप केले होते. त्याला आज खडसेंनी उत्तर दिलं. मी सेटिंग करत असतो, तर कोहिनूर मिल माझ्या नावावर असती आणि SRAचे प्रकल्प माझ्या नावावर असते, अशा शब्दांत खडसेंनी राज ठाकरेंना टोला हाणला होता.



First Published: Tuesday, March 12, 2013 - 14:06


comments powered by Disqus