वीणा पाटील यांची नवी इनिंग, राज ठाकरेंच्या शुभेच्छा

वीणा पाटील यांच्या नव्या कंपनीच्या पहिल्या ऑफिसचं उदघाटन मंगळवारी कांदिवलीमध्ये झालं. केसरीमधून बाहेर पडल्यानंतर वीणा पाटील यांनी `वीणा पाटील हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड` या नावानं नवी कंपनी सुरू केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 19, 2013, 01:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वीणा पाटील यांच्या नव्या कंपनीच्या पहिल्या ऑफिसचं उदघाटन मंगळवारी कांदिवलीमध्ये झालं. केसरीमधून बाहेर पडल्यानंतर वीणा पाटील यांनी `वीणा पाटील हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड` या नावानं नवी कंपनी सुरू केलीय. त्यांच्या पहिल्या ऑफिसचं राज ठाकरेंच्या हस्ते उदघाटन झालं. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या विलेपार्ले, घाटकोपर, ठाणे आणि डोंबिवलीमध्येही त्यांचं ऑफिस सुरू होणार आहे.
यावेळी ‘एका बागेची मशागत करून, ती फुलवल्यानंतर त्या एका बागेत साऱ्यांना जागा होणार नसल्याचे लक्षात आल्यावरच दुसरी बाग फुलविण्याचा निर्णय घेतला... आयुष्यात संधी सगळ्यांना मिळतेच, असे नाही; पण मला नवा ब्रॅंड तयार करण्याची संधी मिळाली’ असं वक्तव्य वीणा पाटील यांनी केलंय. केसरी टूर्सबद्दल बोलताना त्यांनी ‘केसरीभाऊंची सारी मुले हुश्शाआर असल्याने दोन्ही ब्रॅंडना यश मिळेल’ असंही म्हटलंय.

तसंच सध्या फक्त उच्च मध्यमवर्गीयांनाच परवडणारं पर्यटन सर्वसामान्यांनाही परवडेल अशा पद्धतीनं उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही वीणा पाटील यांनी दिलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.