पोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबन

साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2013, 03:33 PM IST

www.24taas.com, मुंबई
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.
भारिप आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, काँग्रेस वीरेंद्र जगताप, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जयस्वाल यांच्यासह १४ आमदारांनी मारहाण केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या आमदारांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

मारहाण करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाईची सर्वपक्षीय मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मारहाण करणाऱ्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता होती. शिवाय या पाच आमदारांना पोलीस कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे.
पाच आमदारांमध्ये मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांचा समावेश आहे. दोषींविरोधात कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दिले होते. त्यामुळं आज या आमदारांवर निलंबन कारवाई झाली.