मनसेचं पुन्हा एकदा 'खळ्ळखटॅक', परीक्षा पाडली बंद

आयकर विभागाच्या स्टेनो पदासाठी होत असलेली परीक्षा मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली. सर्व उमेदवार परप्रांतीय असल्याचा आरोप करत मुलुंडच्या महापालिका कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला.

Updated: Feb 16, 2013, 06:44 PM IST

www.24taas.com, मुंबई
आयकर विभागाच्या स्टेनो पदासाठी होत असलेली परीक्षा मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली. सर्व उमेदवार परप्रांतीय असल्याचा आरोप करत मुलुंडच्या महापालिका कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. या घटनेमुळे परप्रांतियांच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं स्पष्ट आहे.
मनसेनं सुरू असेलेली परीक्षा बंद पाडली. आयकर विभागाची ही परीक्षा सुरू होती. स्टेनो पदासाठी ही परीक्षा होती. या परिक्षेसाठी सर्व उमेदवार परप्रांतीय असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच धुडगूस घातला. त्यांनी परिक्षेत अडथळा आणत परीक्षाच बंद पाडली.
मुलुंडच्या महापालिका कार्यालयात हा धुडगूस घालण्यात आला. स्टेनो पदासाठीची परीक्षा बंद पाडली आली आणि मनसेने पुन्हा एकदा `खळ्ळखटॅक`! दाखवून दिलं. याआधीही मनसेने अशाच प्रकारे रेल्वे भरती परीक्षेला देखील विरोध केला होता. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अटकही झाली होती.