मनसेची जाळपोळ, भंपकपणा आला समोर

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, February 28, 2013 - 17:53

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यावर महाराष्ट्र भरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. विविध ठिकाणी मनसैनिकांनी दगडफेक, तोढफोड आणि जाळपोळ करत आपल्या आंदोलनाची तीव्रता दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र या आंदोलनातील भंपकपणा समोर आला आहे. पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी यांनी ही माहिती समोर आणली आहे.
रस्त्यात जाळपोळ दिसावी, यासाठी मनसैनिकांनी एक जुनी मारुती ८०० ही गाडी स्वतःच विकत घेतली आणि भर रस्त्यात जाळली. त्यतून जाळपोळ सुरू असल्याचं चित्र उभं केलं. हे कृत्य करणाऱ्या चार मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलं आहे.

अहमदनगर येथे राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यावर सर्वत्र मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईमध्ये कुर्ल्याला LBS रोडवरदेखील हे आंदोलन सुरू होतं. याच आंदोलनामध्ये जाळपोळ दाखवण्यासाठी मनसैनिकांनी एक जुनी मारुती ८०० विकत घेतली. आणि ती पेटवली. यातून मनसे आंदोलनातला भंपक दिसून आला.

First Published: Thursday, February 28, 2013 - 17:53
comments powered by Disqus