‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?

Last Updated: Friday, March 8, 2013 - 10:32

www.24taas.com, मुंबई
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतला ‘टी’ आणखी पॉवरफुल्ल होणार आहे.

या आघाडीचा पहिला टप्पा म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सहा जागा शिवसेना-भाजप आणि मनसे यांच्यात समप्रमाणात वाटून घेण्याचा निर्णय अंतिम टप्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
लोकसभा निवडणुकीतील संभाव्य मतदारसंघ वाटप कसं असेल ते पाहुयात...
शिवसेनेकडे : उत्तर - पश्चिम मुंबई तसंच उत्तर - मध्य मुंबई
मनसेकडे : दक्षिण – मध्य आणि मुंबई - ईशान्य मुंबई
भाजप : दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईFirst Published: Friday, March 8, 2013 - 08:43


comments powered by Disqus