आबांनी घेतला ठाकरे बंधुंचा समाचार....

गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी ठाकरे बंधूंकडून होणा-या टीकेचा समाचार घेतला आहे. कोल्हापूरच्या सभेत राज यांनी आर.आर.पाटील यांना इशारा दिला होता.

Updated: Feb 19, 2013, 02:42 PM IST

www.24taas.com, मुंबई
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी ठाकरे बंधूंकडून होणा-या टीकेचा समाचार घेतला आहे. कोल्हापूरच्या सभेत राज यांनी आर.आर.पाटील यांना इशारा दिला होता... यावर बोलताना अशा धमक्यांना जुमानत नाही असा हल्लाबोल आबांनी केला आहे.. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची कीव करावी वाटते असा समाचार आबांनी घेतला आहे.
‘आर. आर. पाटील यांनी माझ्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना धमक्या देतात.. यापुढे लक्षात ठेवा.. जर आर. आर. पाटील यांच्या लोकांकडून माझ्या लोकांना धमक्या गेल्या तर आर. आर. पाटील तुमच्या लोकांनाही माझ्याकडून धमक्या जातील.’ असे राज ठाकरे यांनी भर सभेत सुनावले होते. मात्र राज ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले, तर महाराष्ट्र सुरक्षित आहे, आणि यापुढेही सुरक्षित राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनींही आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांनतर त्यांचाही समाचार आर. आर. पाटीलांनी घेतला. उद्धव ठाकरे यांची कीव येते असे म्हणत आर. आर. पाटील यांनी उद्धव ठाकरेंवरही बोचरी टीका केली. राज-उद्धव यांच्यावर आबांनी टीकास्त्र सोडलं. राजच्या धमक्यांना जुमानत नाही कोल्हापूरच्या सभेत राजनी दिलेला इशारा याला आबांनी उत्तर दिले. तर मला त्यांची कीव करावी वाटते,` असे म्हणत उद्धव ठाकरेंवरही आबा बरसले.