राज ठाकरेंचा निशाणा कोणावर?

Last Updated: Saturday, April 6, 2013 - 18:07

www.24taas.com, जळगाव
आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या दौ-यात जळगावमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाकुणाचा समाचार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यावेळी त्यांच्या रडारवर जळगावातल्या घरकुल घोटाळ्यातील सहआरोपी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकरही येऊ शकतात.
एकेकाळी सुरेश जैन य़ांचे खंदे समर्थक असलेले परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर योग्यवेळी जैन यांच्या तंबूतून बाहेर पडले असले तरी जळगावातील घरकुल घोटाळा प्रकरणानं त्यांची पाठ सोडलेली नाही. या घोटाळ्यात सहआरोपी असलेल्या देवकरांना तूर्तास तरी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळालाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी जळगावात जाहीर सभा होतेय. सभेचं ठिकाण देवकरांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. आपल्या सभांमधून विरोधकांवर टीकेचे आसूड ओढणारे राज ठाकरे देवकरांचाही समाचार घेण्याची शक्यता आहे. याआधींच्या सभांमधून आपल्या विरोधकांवर टीकास्त्र सोडणा-या राज यांच्या रडारवर कोण-कोण असणार याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगतेय...

First Published: Saturday, April 6, 2013 - 18:07
comments powered by Disqus