राज ठाकरे यांना थकवा, दौरा रद्द

By Surendra Gangan | Last Updated: Monday, March 18, 2013 - 10:57

www.24taas.com,नागपूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांना खूप थकवा जाणवत असल्याने त्यांनी आजचा मुरमाडी दौरा रद्द केला आहे. राज सध्या नागपुरात आहेत.
काल दिवसभर नागपूरचा दौरा केला. दौऱ्यानंतर राज ठाकरे हे नागपूर मुक्कमी असून ते रविभवनमध्ये विश्रांती घेत आहेत. दरम्यान, काल रात्री त्यांनी चालणे पसंत केले. मात्र, दौरा आणि त्यांची दौऱ्यानिमित्ताने झालेली धावपळ यामुळे थकवा जाणवू लागला. त्यातच कडक उन्ह असल्याने वातावरण तप्त आहे.

राज ठाकरे आज मुरमाडी गावाला भेट देणार होते. पिढीत मुलींच्या गावाला ते जाणार होते. मात्र, थकवा जाणवत असल्याने भंडारा दौरा रद्द केला. पुढील दौरा कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठरविणार आहेत. त्यांचा २४ मार्चपर्यंत विदर्भ दौरा आहे.

First Published: Monday, March 18, 2013 - 10:57
comments powered by Disqus