....तर यापुढे घरात घुसून मारतील- राज

Last Updated: Saturday, March 2, 2013 - 22:57

www.24taas.com, जालना
‘गडी बिथरलाय’ या अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना... राज ठाकरेंनी सरळ घरात घुसून मारतील, असा सज्जड दमच भरला... ‘मी असं काय वावगं बोललो... काय चुकीचं बोललो.. यापुढे लक्षात ठेवा यापुढे लोकं तुमच्या घरात घुसून मारतील... माझ्या पेक्षा जनता तुम्हांला काय शिव्या घालतात ते पहा.. जशास तसे उत्तर देऊ म्हणे, या तर बघू मग... होऊन जाऊ दे... महाराष्ट्र काय यांचा बापाचा आहे.... पोलीस काढा बाजूला, तुमच्या दोन पायावर परत जाल का पहा जरा.’
‘कोंबडं दाबलं तरी उगवायचं राहत नाही.’ असं म्हणत अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्राशी असभ्य भाषेत बोलणाऱ्यांसाठी माझी भाषा अशीच राहील असंही राज ठणकावून म्हणाले. रस्ते, पाणी, वीज आणि गृहखातं अशी चार महत्त्वाची खाती गेली १४ वर्ष राष्ट्रवादीच्या हातात आहेत. गेल्या १४ वर्षात या खात्यांमध्ये त्यांनी कधी काही केलंच नाही उलट त्यांनी महाराष्ट्रावर बलात्कारच केला अशी घणाघाती टीका राज यांनी केली.

माझं आणि पक्षाचं नाव बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी षडयंत्र करत असून त्यासाठी ते कुठल्याही थराला जातील असा आरोप राज यांनी केला. पण यामुळे मी थांबणार नाही... उलट जशास तसे उत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले... तसंच केसेस करा.... मी केसेस ना घाबरत नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. जशास तसं उत्तर देण्याची भाषा आत्ता करणारे अजित पवार मुंबईत पोलिसांवर झालेल्या अत्याचाराच्यावेळी मूग गिळून का बसले होते असा थेट सवाल राज ठाकरेंनी अजित पवारांना केला.

First Published: Saturday, March 2, 2013 - 22:53
comments powered by Disqus