नारायण राणे जमिनी बळकवण्यात मग्न - राज

कोकणातल्या लोकांवर नारायण राणेंची दहशत आहे आणि त्यांच्याच जमिनी बळकावण्याचं कारस्थानही त्यांच्याकडूनच होतंय

Updated: Feb 15, 2013, 11:01 PM IST

www.24taas.com, खेड
कोकणातल्या लोकांवर नारायण राणेंची दहशत आहे आणि त्यांच्याच जमिनी बळकावण्याचं कारस्थानही त्यांच्याकडूनच होतंय, असं म्हणत राज ठाकरेंनी नारायण राणेंवर जोरदार हल्ला चढवला. तसंच परप्रांतिय कोकणच्या लोकांच्या जमिनी बळकावतायत, बेसावध राहू नका, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.
नारायण राणे यांच्या मालवण भागात मोठ्या प्रमाणात जमिनीसाठी धमकावणी होत असते. असा आरोपही राज ठाकरेंनी केला. आणि तसं जर राणे करीत नसतील तर राणेंनी त्याचा खुलासा करावा... असं म्हणत राज ठाकरेंनी राणेंवर अनपेक्षितपणे हल्ला चढवला. त्यामुळे राणे आता राज ठाकरेंना काय उत्तर देणार याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

कोकणी माणसानं आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नये असंही त्यांनी बजावलं. जैतापूरबाबत आपली भूमिका कायम ठेवत प्रकल्पाला त्यांनी समर्थन दिलं. खेडमध्ये सभा घेऊनही त्यांनी भास्कर जाधव आणि शिवसेनेवर टीका करण्याचं मात्र टाळलं.