राज ठाकरेंच्या भेटीला रतन टाटा !

Last Updated: Friday, March 8, 2013 - 16:39

www.24taas.com, मुंबई
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा हे कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. रतन टाटा ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. राज ठाकरेंनी टाटा यांचं स्वागत केलं आहे. टाटा यांनी राज यांची सदिच्छा भेट घेतली आहे.
रतन टाटा यांनी राज ठाकरेंची भेट घेत काहीवेळ त्यांचाशी चर्चाही केली. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी रतन टाटांचे स्वागत करून त्यांच्यांशी गप्पा मारल्या. रतन टाटा यांनी काही महिन्यापूर्वीच टाटा समूहातून निवृत्ती घेतली आहे.
२०१४ च्या आगामी निवडणुका पाहता राज ठाकरे यांची रतन टाटा यांनी घेतली भेट ही महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. मात्र अजूनही या भेटीत काय चर्चा झाल्या हे स्पष्ट झालेले नाही.

First Published: Friday, March 8, 2013 - 16:33
comments powered by Disqus