`राज ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात`

राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.

जयवंत पाटील | Updated: Mar 11, 2013, 05:40 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.
राज ठाकरे कशाप्रकारे पाठित खंजीर खुपसतात हे आता भाजपला कळलं असेल अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे. शिवाय सेटलमेंटचे आरोप करुन राज ठाकरे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विधानसभेचे शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी केला आहे. आधी भाजप मनसे यांचे एकमेकांशी फार गोड संबंध होते. भाजपला याबद्दल आम्ही सावधानही केलं होतं. आता भाजपला या गोष्टीचा अनुभव आला असेल, असं सुभाष देसाई म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद उमटले आहे. नाशिकमध्ये मनसेसोबत असलेली युती भाजप तोडण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात भाजपने बैठक बोलवली आहे.