‘शर्ट इन’ केलेले पवार... राज ठाकरेंच्या कुंचल्यातून!

राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे व्यंगचित्र रेखाटले आणि उपस्थितांना प्रथमच इन शर्ट केलेले पवार यानिमित्तानं पाहायला मिळाले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 21, 2013, 09:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्ही `शर्ट इन` केलेले शरद पवार कधी पाहिलेत का हो? नाही ना... कसे दिसत असतील बरं पवार या वेशात... हीच कल्पना व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय... आणि रेखाटलंय एक व्यंगचित्र...
अलिकडच्या काळात दिवाळी अंकात व्यगचित्रकारांना स्थान मिळत नसल्याची खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलीय. मुंबईत एका दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे व्यंगचित्र रेखाटले आणि उपस्थितांना प्रथमच इन शर्ट केलेले पवार यानिमित्तानं पाहायला मिळाले. पवारांचं व्यंगचित्र रेखाटताना त्यांनी `मार्मिक`च्याही आठवणी सांगितल्या.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.