लसूण शेव

साहित्य - १ वाटी तेल, तिखट आवडीप्रमाणे (साधारणपणे छोटे चमचे चार), १ चमचा हळद, स्वादानुसार मीठ, साधारण मध्यम आकाराचा लसणीचा गड्डा (पूर्ण सोललेला), ४ वाट्या डाळीचे पीठ एकदम बारीक दळलेले, तळण्याकरता तेल

Updated: Oct 22, 2012, 05:07 PM IST

www.24taas.com, मुंबई

साहित्य -
१ वाटी तेल, तिखट आवडीप्रमाणे (साधारणपणे छोटे चमचे चार), १ चमचा हळद, स्वादानुसार मीठ, साधारण मध्यम आकाराचा लसणीचा गड्डा (पूर्ण सोललेला), ४ वाट्या डाळीचे पीठ एकदम बारीक दळलेले, तळण्याकरता तेल
कृती –
तेल आणि तेवढेच पाणी घेऊन चमच्याने एकत्र करावे. अगदी व्यवस्थित घुसळावे.
त्यात चवीप्रमाणे हळद, तिखट व मीठ घालावे.
सोललेली लसूण मिक्सरला बारीक वाटून घ्यावी व नंतर ती पाण्यात एकत्र करावी, तेच पाणी गाळून वरील मिश्रणात एकत्र करावे.
वरील पाण्यात डाळीचे पीठ घालावे. आता शेव तळण्यासाठी एका कढईत तेल तापण्यास ठेवावे. तयार केलेले पीठ शेव पाडण्याच्या साच्यात घालावे व तेल कडकडीत तापले की त्यात शेव गाळावी.
शेव तळताना ती थेट कढईत गाळावी लागते, चकली सारखी अगोदर तयार करून मग तळू नये.शेव मंद आंचेवर तळावी, नाहीतर आतून कच्ची राहू शकते.